ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक द्या
By Admin | Updated: May 26, 2014 05:31 IST2014-05-26T05:31:26+5:302014-05-26T05:31:26+5:30
वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकांची मागणी रुग्ण कल्याण समितीने केली आहे

ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक द्या
मार्गासनी : वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकांची मागणी रुग्ण कल्याण समितीने केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकपद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनास काम करताना अडथळे येत असून एकाच वैद्यकीय अधिकार्यावर सर्व रुग्णालयाची जबाबदारी पडली आहे. वेल्हे ग्रामीण रुग्णालयाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असहे. गेल्या तीन महिन्यांपासून येथे वैद्यकीय अधिक्षकपद रिक्त आहे. वेल्हे तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय असून तालुक्यातील नागरिकांसाठी हे आरोग्य सेवेसाठी उपयोगी आहे. तसेच आर्थिकदृष्टया गरीब नागरिक उपचारासाठी येत आहेत. परंतु येथे अधिक्षकपद रिक्त असल्याने नागरिकांना येथे सुविधाच मिळत नाही. वारंवार उपचारासाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात सोमवार व शुक्रवार रुग्ण येत असतात. कर्मचारीपदे रिक्त असल्याने येथील प्रशासन व्यवस्था ढासळली असून पर्याय म्हणून भोर येथील उपजिल्हा अधिक्षकांची वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी तात्पुरती नेमणूक केली आहे. परंतु हे अधिक्षक फक्त शुक्रवारी चार वाजता येतात. प्रशासन त्यामुळे येथे सुविधा व्यवस्थित मिळत नाही. फक्त कर्मचार्यांचे पगार काढणे एवढेच काम ते अधिक्षक करत आहेत. (वार्ताहर)