शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

आदर्श कन्या पुरस्कार द्या - शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:32 IST

बिबवेवाडी : आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र पुरस्कारासोबत आदर्श  कन्या पुरस्कार सुरू करावा, ही काळाची गरज आहे, असे मत पद्मभूषण डॉ.  शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देइंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या आदर्श माता-पिता-पुत्र  पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र पुरस्कारासोबत आदर्श  कन्या पुरस्कार सुरू करावा, ही काळाची गरज आहे, असे मत पद्मभूषण डॉ.  शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार्‍या आदर्श माता-पि ता-पुत्र पुरस्कार वितरण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.    पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती, आमदार माधुरी मिसाळ, आमदार  भीमराव तापकीर, काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सरचिटणीस अभय छाजेड, दि  पूना र्मचंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अखिल भारतीय जैन  कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बालचंद खरवड, महावीर प्रतिष्ठानचे  कार्याध्यक्ष विजयकांत कोठारी उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  इंदूबाई झुंबरलाल ललवाणी व कमलबाई धनराज श्रीश्रीमाळ यांना आदर्श मा ता पुरस्कार, तर ओमप्रकाश नगराज रांका यांना आदर्श पिता व राजेश नौप तलाल सांकला यांना आदर्श पुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, आपली आई ही आपल्याला जन्म झाल्या पासून शिकवण्यास सुरुवात करते. आपल्याला बोलायला, चालायला, प्र त्येक गोष्ट शिकवते. त्यामुळे आई ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शिक्षिका अस ते. आपण ज्या देशात जन्माला आलो, त्या देशाला देखील आपण माता  म्हणतो. आपली भारतमाता. ज्या भाषेत आई आपल्याला बोलायला शिकवते  त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. ज्या मातीत आपण वाढतो त्या मातीला  आपण भूमाता म्हणतो. तसेच ज्या तुळशीला प्रमुख पाहुण्यांनी पाच नद्यांतून  आणलेले पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली, त्या तुळशीलादेखील आ पण माता म्हणतो. डॉ. कांतीलाल संचेती म्हणाले, की या पुरस्कारासाठी  अभय संचेती यांनी निवड केलेले पुरस्कारार्थी हे खरोखर त्या पुरस्काराला  न्याय देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. अभय संचेती यांनी आपल्या आईच्या  स्मरणार्थ सुरू केलेला हा उपक्रम अतिशय आदर्श उपक्रम आहे.ओमप्रकाश रांका आणि राजेश सांकला यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त  केली. या पुरस्काराने झालेले कौतुक खरोखरीच विसरण्याजोगे नाही आणि  यातून अधिक प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी भवरीलाल फुलफगर, संजय चोरडिया, विजय शिंगवी, रविराज  सांकला, डॉ. अशोक संचेती, अचल जैन, सुनील नहार, वास्तुपाल रांका,  अनिल नहार, राजेश नहार, सुहास बोरा, बाळासाहेब धोका, सुभाष पगारिया,  संतोष संचेती, श्रीपाल ओस्तवाल, माणिक दुगड, गौतम बुरड, संतोष जैन,  संपतलाल बाफना, सुभाष ललवानी, सतीश श्रीश्रीमाळ, मोहनलाल संचेती, किशोर संचेती, दिलीप दर्डा, नंदकुमार चोरडिया, राजेंद्र भटेवरा, सचिन देसरडा, सुरेश वानगोता,प्रकाश दर्डा, कांतीलाल श्रीश्रीमाळ, हरकचंद देसरडा, संपत बोथरा, हरकचंद  मुथ्था, नंदकुमार संचेती, सतीश लुणिया, गिरीश भन्साळी, राजेंद्र लुणिया  आदी उपस्थित होते. किशोरजी संचेती यांनी स्वागत केले. तर मनीष संचेती  यांनी आभार मानले. किरण बोरा यांनी आईविषयीची कविता सादर केली.

ज्यांच्यामुळे मी घडलो त्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांची स्मृती कायम  सोबत राहावी आणि त्यांच्यासारख्या आदर्शवत माता-पित्यांचा सन्मान  करावा, या हेतूने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. माता-पि त्याविषयी आदर करण्याची संस्कृती अजूनही जिवंत आहे, याचा मला ठाम  विश्‍वास आहे. गेल्या दीड तपापासून हा वसा मी स्वीकारला असून, येथून  जाताना आई-वडिलांप्रती आदराची भावना घेऊन जा आणि समाजातील ही  कीड मुळापासूनच नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा.- अभय संचेती, अध्यक्ष