इंदापूर नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:45+5:302021-04-01T04:11:45+5:30
बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ३०) दुपारच्या वेळी, गाढवाच्या अंगावर नमस्कार मी इंदापूरचा नवीन मुख्याधिकारी आजपासून सर्व ...

इंदापूर नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्या
बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ३०) दुपारच्या वेळी, गाढवाच्या अंगावर नमस्कार मी इंदापूरचा नवीन मुख्याधिकारी आजपासून सर्व कामे पूर्ण वेळ उपस्थित राहून करीन, असा संदेश लिहिलेला बॅनर गाढवाच्या अंगावर टाकून, त्याला हार घालून, त्याची पूजा करून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्या गाढवाचे स्वागत करून निषेध करण्यात आला.
तर इंदापूर नगरपरिषदे कामानिमित्त अनेक दिवसांपासून जे नागरिक फेऱ्या घालत होते, त्यांनी निषेध म्हणून चक्क गाढवासमोर त्याचा कामाचा प्रस्ताव ठेवून निषेध नोंदवला. या वेळी संजय शिंदे, संतोष क्षीरसागर, राहुल शिंगाडे, नानासाहेब चव्हाण, बलभीम महाराज राऊत, सूरज धाईंजे, नागेश भोसले, ॲड. सूरज मखरे, संतोष धोत्रे, उमेश ढावरे, नितीन देशमाने, भारत मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
३१ इंदापूर
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गाढवाला बॅनर लावून निषेध केला.