शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना मोफत पाणी द्या : महापालिका देणार सर्व मॉल सर्व प्रशासनांना नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:44 IST

हजारो रुपये खर्च करणाऱ्या ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे तसेच स्वच्छतागृह पुरवणे ही सर्वस्वी मॉल प्रशासनाची जबाबदारी असून त्याकरिता पुणे महापालिका शहरातील सर्व मॉल आणि शॉपिंग सेंटरला नोटीस पाठवणार आहे. 

ठळक मुद्देमॉल, शॉपिंग सेंटरमध्ये मिळणार मोफत पाणी आणि स्वच्छतागृह ग्राहकांना प्राथमिक सुविधा न देणाऱ्या मॉल प्रशासनावर महापालिका करणार कारवाई 

पुणे : हजारो रुपये खर्च करणाऱ्या ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे तसेच स्वच्छतागृह पुरवणे ही सर्वस्वी मॉल प्रशासनाची जबाबदारी असून त्याकरिता पुणे महापालिका शहरातील सर्व मॉल आणि शॉपिंग सेंटरला नोटीस पाठवणार आहे. या संदर्भांत शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ज्या मॉल प्रशासनातर्फे या नियमाचे पालन होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

 

   पुणे शहरात मोठ्या संख्येने मॉल  आहेत. शहरातील बहुतांशी मॉल, शॉपिंग सेंटर मध्ये नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते जादा दराने पाण्याची विक्री करतात. सध्या शहरातील मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी ३० ते ४५ रुपये मोजावे लागतात. हे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना जास्तीचे दर द्यावेच लागतात. त्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने त्यांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राणी भोसले यांनी मांडला होता. या प्रस्तावावर शुक्रवार (दि.२७) रोजी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर शहरातील विविध मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये खरेदीसाठी येणा-या नागरिकांना मोफत पाणी पुरवठा व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करू देण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

 

याबाबत शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सांगितले की, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये नियमानुसार मोफत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु शहरातील अनेक मॉलमध्ये ही सुविधा दिली जात नाही. याबाबत प्रत्येक मॉलने दर्शनी भागावर ‘येथे पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.’ असे स्पष्ट लिहीण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. सर्व मॉल, शॉपिंग सेंटरला नोटीसा देण्यात येणार असून, अशी सुविधा न देणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी