दररोज पंचेचाळीस मिनिटे व्यायामासाठी द्यावेत : मंदिरा बेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST2021-02-23T04:17:14+5:302021-02-23T04:17:14+5:30
पुणे : कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतानाच समाजातील इतर महिलांप्रमाणेच मी माझ्या कामाचा फॉर्म्युला ठरविलेला आह़े पण, हे करत ...

दररोज पंचेचाळीस मिनिटे व्यायामासाठी द्यावेत : मंदिरा बेदी
पुणे : कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतानाच समाजातील इतर महिलांप्रमाणेच मी माझ्या कामाचा फॉर्म्युला ठरविलेला आह़े पण, हे करत असतानाच दररोज पंचेचाळीस मिनिटे तरी मी फिटनेसकरिता वेळ देते़ माझ्याप्रमाणे हे सर्वांनाच शक्य असून, २४ तासांतील ७ तास झोपेत सोडले तर, उरलेल्या १७ तासांत आपण ४५ मिनिटे व्यायामाला वेळ दिलाच पाहिजे़ असे मत अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी व्यक्त करीत, व्यायामासाठी व्यायामशाळेचीच गरज आहे असे नसून चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे सांगितले़
आऱ. डी़ देशपांडे होल्डिंग प्रस्तुत, ‘लोकमत अॅच्युव्हर्स पुणे’ या गौरव सोहळ्यानंतर आयोजित मुलाखतीत बेदी यांनी स्वत:च्या फिटनेसबाबत बोलताना तीन टिप्स् दिल्या़ यात चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नसल्याचे सांगतानाच बेदी यांनी, फिट राहण्यासाठी ३० टक्के व्यायाम व ७० टक्के आहाराचे नियोजन हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले़ मला वीस किलो वजन कमी करायचे आहे ते कधी होणार हा विचार करण्यापेक्षा, माझे एक किलो वजन कमी झाले आहे ही सकारात्मकता ठेवून आपण फिटनेसकरिता प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
शांती या टीव्ही मालिकेतून मला प्रसिध्दी मिळाली़ या मालिकेदरम्यान मी एक क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले असताना, मला तेथे क्रिकेट समालोचन करण्याच्या ऑडिशनसाठी बोलविण्यात आले़ तीन वेळा ऑडिशन दिल्यावर मला ही संधी मिळाली असल्याचेही यावेळी बेदी यांनी सांगितले़
------------------
पुण्याविषयी नेहमीच आकर्षण
मला पुणे शहर पहिल्यापासूनच आवडत असून, मला पुण्याविषयी नेहमी आकर्षण राहिले आहे़ येथील वातावरण खूप सुंदर असून, यामुळे नेहमी पुण्यात येत असल्याचे बेदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले़
--------------------------------------