प्रामाणिक नगरसेवकांनाच पद द्या

By Admin | Updated: February 25, 2015 00:38 IST2015-02-25T00:38:55+5:302015-02-25T00:38:55+5:30

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना महापालिकेत पदे देऊ नये, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणा-यांना पदे दिली जावीत

Give candid words to honest councilors | प्रामाणिक नगरसेवकांनाच पद द्या

प्रामाणिक नगरसेवकांनाच पद द्या

पिंपरी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना महापालिकेत पदे देऊ नये, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणा-यांना पदे दिली जावीत, अशी मागणी नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे केली.
शहरातील पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक पवार यांनी घेतली. महापालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी स्थायी समिती निवडणुकीेची मोर्चेबांधणी सुरू आहे. बैठकीस महापौर शकुंतला धराडे, आमदार महेश लांडगे, पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे उपस्थित होते. बैठकीनंतर आयुक्त राजीव जाधव यांच्यासमवेत चर्चा केली. विकासकामांचाही आढावा घेतला. ‘तिन्ही मतदारसंघांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करू’, असेही पवार यांनी सूचित केले.
सदस्यपदाच्या चार सदस्यांचा कालावधी संपल्याने त्याजागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ९३ पैकी ५७ नगरसेवक इच्छुक आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Give candid words to honest councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.