शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

समाविष्ट गावांच्या विकासासाठी ११०० कोटी द्या- सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 4:17 AM

प्रत्येक गावासाठी १०० कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

पुणे : परिसरातील ११ गावांना महापालिकेत समाविष्ट करून विकासासाठी एक पैसाही न देता भारतीय जनता पार्टीने त्यांची चेष्टा चालवली आहे. या प्रत्येक गावासाठी १०० कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या गावांमधील नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेवर सोमवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.खासदार सुळे मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, नवनिर्वाचित गटनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बाळासाहेब बोडके; तसेच सचिन दोडके, प्रकाश कदम व पक्षाचे अन्य नगरसेवक, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा काँग्रेस भवनजवळ आल्यानंतर तुपे, बराटे, तांबे, धनकवडे आदी नेत्यांनी काँग्रेसभवनमध्ये जाऊन महात्मा गांधी, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड हेही काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनात सहभागी झाले. गावांचे समाधान होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांना तुपे यांनी दिला.कर वसूल करता, मग विकासकामेही कराखासदार सुळे यांचे महापालिका प्रवेशद्वारावर भाषण झाले. त्यांनी राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, गावांमधून कर वसूल करता, तर तिथे विकासकामेही करायला हवीत. सरकारने गावांचा समावेश करून दिला व विकासकामांसाठी एक छदामही दिला नाही.विकास आराखडा तयार करण्याचे काम शिष्टमंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रशासन या गावांचा विकास आराखडा तयार करत असून, तत्पूर्वी तिथे कामांना सुरुवातही केली आहे, असे उगले यांनी सांगितले. अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून सर्व गावांमध्ये समान विकासकामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस