मुली परतल्या; शाळेत नाहीत!

By Admin | Updated: July 7, 2016 03:28 IST2016-07-07T03:28:53+5:302016-07-07T03:28:53+5:30

शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात मुली परतल्या; मात्र या मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य न दिल्याने त्या शाळेत हजर राहू शकल्या नाहीत. बालगृहाच्या अधीक्षिका एस. बी. भोरकर

Girls return; Not at school! | मुली परतल्या; शाळेत नाहीत!

मुली परतल्या; शाळेत नाहीत!

शिरूर : शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात मुली परतल्या; मात्र या मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य न दिल्याने त्या शाळेत हजर राहू शकल्या नाहीत. बालगृहाच्या अधीक्षिका एस. बी. भोरकर यांनी शासनाने गणवेशासाठी तरतूदच केली नसल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितले. मात्र गणवेशासाठी मागील वर्षी आणलेले कापड बालगृहात वर्षभरासाठी पडून असल्याचा धक्कादायक प्रकार मुलींनीच समोर आणला.
‘लोकमत’च्या वृत्ताने सहा मुली परतल्या; मात्र त्यांचा त्रास काही कमी झाला नाही. बालगृहात जाऊन माहिती घेतली असता, बालगृहात येऊनही मुली शाळेत गेल्या नसल्याचे निदर्शनास आले. आरटीआय कार्यकर्ते संजय पाचंगे, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी यांनीही मुलींची विचारपूस केली.
आम्हाला गणवेश नसल्याने, तसेच शैक्षणिक साहित्य नसल्याने शाळेत गेलो नसल्याचे मुलींनी सांगितले. याबाबत पाचंगे यांनी भोरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, भोरकर यांनी शासनाने गणवेशासाठी तरतूदच केली नसल्याचे सांगितले. मुलींना गणवेशाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, की गणवेशाचा कपडा व इतर शैक्षणिक साहित्य मागील वर्षी संस्थेत आले. आम्ही स्वत: हे सर्व साहित्य बालगृहात उतरवताना पाहिले. उतरवताना सहकार्यही केले. मागील वर्षभर बालगृहाने सर्व मुलींना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्यापासून परावृत्त ठेवले. कसेबसे मुलींनी मागील वर्ष काढले.
संस्थेत कपडा असताना भोरकर यांनी तरतूद नसल्याची खोटी माहिती दिली. ४ मुलीं दहावी इयत्तेत असताना, अगोदरच त्यांची २१ दिवस अनुपस्थिती लागलेली असतानादेखील मुलींच्या गणवेशाबाबत तसेच इतर साहित्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने गांभीर्याने दखल घेतली नाही. पाचंगे यांनी दुकानातून सहा मुलींसाठी गणवेशाचा कपडा खरेदी करून त्यांच्या ताब्यात दिला. आमच्या खोलीत वीज नाही, पाण्याची सोय नाही अशा तक्रारी मुलींनी मांडल्या. महिला बालकल्याण विभागाचे उपायुक्त शिरसाट यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरूरहून बोलतोय, असे म्हणताच फोन कट केला. पुन्हा फोन घेतलाच नाही. (वार्ताहर)

मिरॅकल इंटरनॅशनल फाउंडेशनने या बालगृहाला मागील आॅगस्टमध्ये भेट दिली असून, हे बालगृह दत्तक घेण्याची शक्यता आहे.
मात्र यासाठी महिला बालकल्याण विभागाचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. उद्या महिला बालकल्याणचे अधिकारी बालगृहाला भेट देणार आहेत.

Web Title: Girls return; Not at school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.