एकतर्फी प्रेमामधून मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: January 13, 2017 03:28 IST2017-01-13T03:28:58+5:302017-01-13T03:28:58+5:30
आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली

एकतर्फी प्रेमामधून मुलीचा विनयभंग
पुणे : आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने मुलीला धमकावत जबरदस्तीने दुचाकीवर बसवत कोरेगाव पार्क भागात नेऊन अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला होता.
व्यंकटेश रूपसिंग राठोड (वय १९, रा. येरवडा) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी येरवड्यातील एका शाळेमध्ये आठवीमध्ये शिकते. तिचे आईवडील मजुरी करतात. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत होता. त्याने तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. तिने घाबरल्यामुळे घरी हा प्रकार सांगितला नाही.
बुधवारी त्याने दमदाटी करीत तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कोरेगाव पार्क भागात नेले. मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढून अश्लील संभाषण केले. मुलीच्या पालकांनी दोघांना पाहिल्यावर आरोपी पसार झाला. पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)