शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

बारावीच्या फेरपरीक्षेतही मुलींचीच आघाडी, उत्तीर्णांची टक्केवारी घटली, राज्याचा निकाल २४.९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 2:29 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालात मुलींनीच आघाडी घेतली असून, औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे.राज्य मंडळाकडून जुलैमध्ये घेतल्या जाणा-या फेरपरीक्षेचे यंदा दुसरे वर्ष होते. नऊ विभागीय मंडळांमधून नोंदणी केलेल्या एकूण ९४ हजार ३३६ विद्यार्थ्यांपैकी ९३ हजार २७१ जणांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २८.७२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्केवारी २३.६१ एवढी आहे. एकूण ७ हजार ८४ मुली व १६ हजार १९९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. विभागनिहाय निकालामध्ये औरंगाबाद विभाग अव्वल ठरला आहे. या विभागाचा निकाल सर्वाधिक ३७ टक्के लागला असून, त्याखालोखाल नागपूरचा निकाल ३४.१४ टक्के आहे. मुंबई विभागातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, हा विभाग १८.७४ टक्के निकालासह तळाला राहिला.शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ३०.८० टक्के, कला शाखा २३.९८ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल २२.५४ टक्के आहे. व्यावसायिक शाखेचा निकाल २४.६२ टक्के लागलाआहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी मिळाली असून, ५१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर १ हजार ९१ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी आणि २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.मूळ गुणपत्रिका २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ नंतर महाविद्यालयात मिळणार.२२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत गुणपडताळणी करता येणार.२२ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळतील.सहा विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करता येणार.उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मिळाल्यानंतर, पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.

विभागनिहाय टक्केवारीविभाग परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारीपुणे १७२८४ ४४७४ २५.८९नागपूर ९९५२ ३३९८ ३४.१४औरंगाबाद ७१३८ २६४१ ३७.००मुंबई २६७७१ ५०१६ १८.७४कोल्हापूर ८०८३ २०३४ २५.१६अमरावती ७२९८ १४१२ १९.३५नाशिक १०८८५ २७६० २५.३६लातूर ४९८१ १३६४ २७.९३कोकण ८७९ १८४ २०.९३एकूण ९३२७१ २३२८३ २४.९६

टॅग्स :Studentविद्यार्थी