शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

काठीने बेदम मारहाण करण्यात आलेल्या ‘त्या ’मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:34 IST

धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत.

ठळक मुद्देपोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात काही दिवसांपुर्वीच गुन्हा दाखल

पुणे : धनकवडी परिसरातील मतिमंद मुलांच्या संस्थेतील सोळा वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २१ आॅगस्ट) मृत्यू झाला. एका सदनिकेत सुरू असलेल्या या संस्थेमध्ये मुलांना काठीने मारहाण करणे, अस्वच्छता, शिळे अन्न खायला दिले जात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सहकारनगरपोलिस ठाण्यात काही दिवसांपुर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैष्णवी अनिल हातेकर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्त्या कांचन दोडे, किर्ती भंडगे आणि रजनी जोगदंड यांच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.वैष्णवीची चुलत बहीण गायत्री सुनिल हातेकर (वय १८) हिने फिर्याद दिल्यानंतर संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडीतील मोहननगर परिसरातील एका इमारतीमध्ये ‘अक्षरस्पर्श’ नावाची संस्था असून दिपाली संदीप निखळ या संचालिका आहेत. वैष्णवीला दि. २७ जुलै २०१७ रोजी आई-वडिलांनी संस्थेत दाखल केले होते. काही दिवसांपुर्वी तिची बहीण व आजी भेटण्यासाठी संस्थेत गेल्या होत्या. मात्र, तिची तब्येत ठिक नसल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले असल्याची महिती त्यांना मिळाली. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिच्या अंगावर मारहाणीचे जखमा आढळून आल्या. तसेच ती काही दिवसांपासून उपाशी असल्याचे निदर्शनास आले. तीन आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मंंगळवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.--------------

टॅग्स :Crimeगुन्हाSahakar NagarसहकारनगरPoliceपोलिस