खांबावरून वीजप्रवाह घरात शिरून बालिका मृत्युमुखी
By Admin | Updated: September 9, 2015 04:29 IST2015-09-09T04:29:13+5:302015-09-09T04:29:13+5:30
महावितरण खांबावरून वीजप्रवाह घराच्या पत्र्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बालिकेचा मृत्यू झाला, तर दोन महिलांसह ५ जण जखमी झाले़

खांबावरून वीजप्रवाह घरात शिरून बालिका मृत्युमुखी
पुणे : महावितरण खांबावरून वीजप्रवाह घराच्या पत्र्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बालिकेचा मृत्यू झाला, तर दोन महिलांसह ५ जण जखमी झाले़ ही घटना सिंहगड रोडवरील पानमळा येथील वस्तीत झाली़
अद्वैता चंद्रकांत वाघमारे (वय अडीच) असे मृत बालिकेचे नाव आहे़ मिळालेली माहिती अशी, रामकृष्ण मठासमोर ही वस्ती असून, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली़ त्या वेळी तेथील खांबावरून आलेल्या वायरमधील वीजप्रवाह ४ ते ५ घरांतील पत्र्यांत शिरला़
पानमळा येथील घटना; ५ जखमी
ही घरे बैठी असून, वरती पत्रे व जिना आहे़
पत्र्यातून वीजप्रवाह जिन्यात शिरल्याने वर असणारे तिथेच अडकून पडले़
नगरसेवक राहुल तुपेरे यांनी सांगितले, की या ठिकाणी वायरीचे जंजाळ निर्माण झाले असून, यापूर्वी आपण अनेकदा या सर्व वायरी काढून केबल टाकून द्यावी, अशी मागणी केली होती़ पण ते काम न झाल्याने आज एका बालिकेला आपला प्राण गमावण्याची वेळ आली़
ही घटना नेमकी कशी घडली व त्यात कोणाची
चूक आहे, याची चौकशी करण्यास इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरला कळविण्यात आले आहे़ ते उद्या
प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी करणार असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले़