तरुणी आढळली बेशुद्धावस्थेत
By Admin | Updated: October 26, 2014 00:15 IST2014-10-26T00:15:21+5:302014-10-26T00:15:21+5:30
पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील आनंद पार्क उद्यानात शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली.

तरुणी आढळली बेशुद्धावस्थेत
पिंपरी : पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील आनंद पार्क उद्यानात शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. वैद्यकीय तपासणीनंतर तरुणीशी कसलेही गैरकृत्य झाले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करणो आणि अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैफान मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपुरम चौकातील एका उद्यानात शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास एक तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. एका तरुणाने त्या तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या ओळखपत्रवरून तिची ओळख पटली. वैद्यकीय तपासणीत तरुणीशी गैरकृत्य न झाल्याचे स्पष्ट झाले. गुंगीचे औषध देणो आणि अपहरण करण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एकाला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)