पुणे : कसबा पेठेतील एका वकिलाच्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़. ही घटना रविवारी दुपारी घडली . माधवी विशाल काळे (वय १७) असे या युवतीचे नाव आहे़. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधवी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती़. ती रविवारी सकाळीच क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली़. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती क्लासवरुन परत आली़. ती घरात असलेल्या साई विधी इमारतीचे काम सुरु आहे़. माधवी ही क्लासवरुन परत आल्यावर घरी जाण्याऐवजी सरळ टेरेसवर गेली व तेथून तिने खाली उडी मारली़. हे पाहताच लोकांनी तेथे धाव घेतली़. तिला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़. तिच्या डोक्याला, पायाला व पाठीला जबर दुखापत झाली होती़. तेथे उपचारादरम्यान तिचा दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला़. शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे़.माधवीच्या आत्महत्त्येचे कारण अद्याप समजले नसून फरासखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.
कसबा पेठ येथे युवतीची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:08 IST
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़.
कसबा पेठ येथे युवतीची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्त्येचे कारण अद्याप अस्पष्ट