गुंगीचे औषध देऊन मुलीला डांबले
By Admin | Updated: November 26, 2014 00:08 IST2014-11-26T00:08:37+5:302014-11-26T00:08:37+5:30
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अप्पर इंदिरानगर येथील शेळकेवस्तीतील एका खोलीत बाथरूमच्या पोटमाळ्यावर डांबून ठेवल्याचा प्रकार घडला.

गुंगीचे औषध देऊन मुलीला डांबले
पुणो : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अप्पर इंदिरानगर येथील शेळकेवस्तीतील एका खोलीत बाथरूमच्या पोटमाळ्यावर डांबून ठेवल्याचा प्रकार घडला. तिच्यावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध बाललैगिंक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दयाश्ांकर बैजू शर्मा (वय 32, रा. मूळगाव उत्तर प्रदेश), अमरनाथ रामस्वरूप शर्मा (वय 19, रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हनुमंत चंद्रकांत निगवळी (वय 4क्, रा. चैत्रबन वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. दिलीप द्वारकाप्रसाद शर्मा (वय 2क्, शेळकेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याचा पोलीस तपास करीत आहे.
आरोपींनी संनगमत करून अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये कोणी नातेवाईक नाही याचा गैरफायदा घेत तिला आरोपींच्या घरी बोलावले. तिथे तिच्या नाकाला गुंगीचे औषध लावून बेशुद्ध केले व बाथरूमच्या पोटमाळ्यावर डांबून ठेवले. पीडित मुलगी अर्धवट बेशुद्ध व घाबरलेल्या अवस्थेत आढळली.
दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील लीना पाठक यांनी युक्तिवाद केला, की मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत काय, या घटनेत कोणाकोणाचा सहभाग होता याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी दोघांना 28 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली.