खासगी शिकवणीत मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: March 21, 2017 05:15 IST2017-03-21T05:15:07+5:302017-03-21T05:15:07+5:30

खासगी शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना

Girl molestation in private lessons | खासगी शिकवणीत मुलीचा विनयभंग

खासगी शिकवणीत मुलीचा विनयभंग

पिंपरी : खासगी शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी संत तुकारामनगर येथे घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
राजेश नारायण जोशी (वय ५४, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने (वय ३८, रा. पुणे) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दहा वर्षांची मुलगी संत तुकारामनगरमध्ये एका ठिकाणी खासगी शिकवणीसाठी गेली होती. त्या वेळी आरोपीने तिला क्लासच्या आतील खोलीत बोलावून पुस्तक वाचण्यास सांगितले. या वेळी तिचा विनयभंग केला. (प्रतिनिधी)

Web Title: Girl molestation in private lessons