गुंडाच्या मारहाणीने मुलगी अत्यवस्थ

By Admin | Updated: January 28, 2015 02:33 IST2015-01-28T02:33:03+5:302015-01-28T02:33:03+5:30

एका १३ वर्षांच्या मुलीला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने ती जखमी झाली असून, वेदना असह्य होत असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवसापासून उपचार सुरू आहेत.

The girl with the bully is inexplicable | गुंडाच्या मारहाणीने मुलगी अत्यवस्थ

गुंडाच्या मारहाणीने मुलगी अत्यवस्थ

पिंपरी : एका १३ वर्षांच्या मुलीला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने ती जखमी झाली असून, वेदना असह्य होत असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात दोन दिवसापासून उपचार सुरू आहेत. या संदर्भात मुलीच्या आईने पोलीस आयुक्तालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, पोलिसांकडून काहीच हालचाल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत ही पिडीत मुलगी राहते. वडील ८ महिन्यांपूर्वी वारले आहेत. आई, बहिण, भाऊ आणि आजी असे पाच जण राहतात. आई धुणीभांडीचे काम करुन कुटुंबांचे पालनपोषण करते. गेल्या मंगळवारी (दि.२०) सायंकाळी झोपडपट्टीतील भास्कर अंबादास गायकवाड या गुंडाने मुलीच्या आईस शिवीगाळ करीत हाताबुक्काने मारहाण केली. या वेळी आईला सोडविण्यास ती गेली असता तिलाही गायकवाड याने हाताबुक्काने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात चिंचवड पोलीस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार नोंदविली. पोलिसांनी अदखपात्र नोंद केली आहे. सोमवारपासून (दि.२६) मुलीला अधिक त्रास होऊ लागला. पोट आणि छातीत असह्य वेदना होऊ लागल्या. यामुळे तिला उपचारासाठी काळेवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता. तिच्या छातीच्या बरगड्यात, पोटात आणि पाठीत दुखापत झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रविण ढोर्ले यांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तिला सलाईन लावले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मात्र, अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे पिडीत मुलीच्या आईने सांगितले. गायकवाड यांची परिसरात दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे महिलेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. घटना घडून आठवडा उलट्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने मुलीच्या आजीने आश्चर्य व्यक्त केले. हा अन्याय आम्ही आणखी किती दिवस सहन करायचा असा सवाल त्यांनी केला. पिडीत मुलीचे सहावीपर्यत पालिका शाळेत शिक्षण झाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तिने शिक्षण अर्ध्यावर सोडून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The girl with the bully is inexplicable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.