गिरीश प्रभुणे ( परिचय आणि प्रतिक्रिया)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:46+5:302021-02-05T05:02:46+5:30
सामाजिक क्षेत्रात गिरीश प्रभुणे यांचे योगदान बहुमूल्य आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या ...

गिरीश प्रभुणे ( परिचय आणि प्रतिक्रिया)
सामाजिक क्षेत्रात गिरीश प्रभुणे यांचे योगदान बहुमूल्य आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरतपणे कार्य करीत आहेत. त्यांनी तुळजापूर जवळच्या यमगरवाडी वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत आहेत. चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये भटक्या समाजातल्या साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे या समाजात होत असलेल्या धर्मांतरासारख्या समस्या रोखण्यासही मदत झाली आहे. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रभावी लिखाणातूनही भटक्या-विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडलं आहे आणि त्यामुळे त्या समाजाच्या समस्या सर्वत्र पोचण्यास मदत झाली आहे.'' पारधी'', ''लोक आणि संस्कृती'', '' पालावरच जिण'' ही प्रभुणे यांची गाजलेली पुस्तके आहेत.
......
सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले तेव्हा अनेकांच्या सहकार्याने हे काम करू शकलो. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्नेही, प्रचारक दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर रमेश पतंगे तसेच भटक्या विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे या विषयाला न्याय देण्यात मला यश मिळाले. महाराष्ट्रात पारधी म्हटले की चो-या माऱ्या, दरोडे असे असायचे. पण यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 100 पारधी महिला पुरुष निवडून आले. या लोकशाहीच्या प्रवाहात माझा खारीचा वाटा आहे याचे मला समाधान आहे.
- गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
.....