शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घुमान-पंढरपूरचा रेल्वे प्रश्न मार्गी लागणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:18 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.

प्रज्ञा केळकर - सिंग 

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे पार पडल्यानंतर घुमान रेल्वे मार्गाशी जोडले जावे, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि घुमान रेल्वे मार्गाने जोडले जावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. ब्यास ते कादियान या रेल्वे मार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामुळे घुमान-पंढरपूरचा रेल्वेचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पंजाबच्या ज्या भूमीत संत नामदेवांनी मानवतेचा नंदादीप लावला, ती घुमाननगरी वारक-यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरशी जोडली जावी, यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पंजाब आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक बंध दृढ व्हावेत, यादृष्टीने ८८ वे साहित्य संमेलन घुमनाला आयोजित करण्यात आले होते. यावेळी घुमानपर्यंत रेल्वे पोहोचावी, अशी मागणी सरहद संस्थेतर्फे करण्यात आली होती.  तत्पूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर ते घुमान रेल्वे मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी आयुष्यातील दीर्घ काळ घुमानमध्ये वास्तव्य केले. घुमान येथील गुुरुद्वारा आणि मंदिरातून त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. 

महाराष्ट्र आणि पंजाबमधील नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टीने पर्यटन सोपे व्हावे, यासाठी पंढरपूर आणि घुमान रेल्वे सुरु व्हावी, अशा आशय विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रात नमूद केला होता. ‘सरहद संस्थेतर्फे घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. परस्पर संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने सरकारनेही सकारात्मक पाऊल उचलण्यात यावे’, अशी आशा पत्रातून व्यक्त करण्यात आली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. ब्यास ते कादियान रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने घुमान ते पंढरपूर रेल्वेच्या कामालाही गती मिळेल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.विजयसिंह मोहिते-पाटील   घुमान ते पंढरपूर मार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यानंतर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. या रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करणार आहे. घुमानपर्यंत रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने ही मागणीही पूर्णत्वास जाईल, अशी आशा वाटते. 

टॅग्स :railwayरेल्वेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी