शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 20:10 IST

महापालिकेच्या वतीने व बागुल यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान आणि सोलर रुफ पॅनल पार्किंग उभारणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाला कोणताही बाधा न आणता प्रकल्पांची उभारणी नागरिकांची सह्याची मोहीम घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न १०७ एकर जागेपैकी काही जागेबाबत न्यायालयात वाद सुरु श्रेयवादासाठी पुणेकरांच्या, पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला विरोध झाडांची कत्तल करून जाळलेले फोटो बोगस

पुणे: शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या व त्यावरील जैववैविध्या यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार केला आहे. या आरखड्याचा एक भाग म्हणून तळजाई टेकडीवर पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. तळजाई टेकडीवर तब्बल १०७ एकरवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, सोलर रुप पॅनल पार्किंग उभारणार आहे. परंतु, तळजाई टेकडीची जागा बिल्डराच्या घशात घालण्यासाठी काही लोकांकडून या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचा आरोप नगरसेवक आबा बागुल यांनी केला. महापालिकेच्या वतीने व बागुल यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान आणि सोलर रुफ पॅनल पार्किंग उभारणार आहे. परंतु सोलर रुफ पॅनल पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करणार असल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक संजय जगताप यांनी विरोध केला आहे. तसेच यासाठी नागरिकांची सह्याची मोहीम घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आबा बागुल यांनी पत्रकर परिषद घेऊन प्रकल्पाची माहिती दिली. बागूल यांनी सांगितले की, महापालिकेकडून हिल टॉप हिलस् अतंर्गत आरक्षण टाकले आहे. या १०७ एकर जागेपैकी काही जागेबाबत न्यायालयात वाद सुरु आहेत. परंतु यापैकी सुमारे ७० एकर जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात असून, अन्य शिल्लक जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु ही शिल्लक जागा बिल्डराच्या घशात घालण्यासाठी संबंधित नगरसेविकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप बागुल यांनी केला. तसेच श्रेयवादासाठी पुणेकरांच्या, पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचे बागुल यांनी सांगितले.तळजाई टेकडीवर प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी सर्व प्रशासकी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मे अखेर पर्यंक काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु जगाताप यांच्याकडून वारंवार करण्यात येत असलेल्या विरोधामुळे काम रखडले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आता पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे बागुल यांनी स्पष्ट केले.--झाडांची कत्तल करून जाळलेले फोटो बोगसतळजाई टेकडी येथील झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात झाडे जाळण्यात आल्याचे फोटोचे बॅनरबाजी करून नागरिकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. परंतु झाडे जाळलेल्याची फोटो बोगस असून, नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून नक्की झाडे तोडली का, ती जाळण्यात आली का, कोणी हा प्रकार केला याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीAba Bagulआबा बागुलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका