तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:06 PM2019-03-06T20:06:00+5:302019-03-06T20:10:47+5:30

महापालिकेच्या वतीने व बागुल यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान आणि सोलर रुफ पॅनल पार्किंग उभारणार आहे.

Ghazal to build the place of Taljai hill in the throes of the builder: Aba Bagul | तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल 

तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल 

Next
ठळक मुद्देपर्यावरणाला कोणताही बाधा न आणता प्रकल्पांची उभारणी नागरिकांची सह्याची मोहीम घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न १०७ एकर जागेपैकी काही जागेबाबत न्यायालयात वाद सुरु श्रेयवादासाठी पुणेकरांच्या, पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला विरोध झाडांची कत्तल करून जाळलेले फोटो बोगस

पुणे: शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या व त्यावरील जैववैविध्या यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार केला आहे. या आरखड्याचा एक भाग म्हणून तळजाई टेकडीवर पर्यावरणपूरक विकासाचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. तळजाई टेकडीवर तब्बल १०७ एकरवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, सोलर रुप पॅनल पार्किंग उभारणार आहे. परंतु, तळजाई टेकडीची जागा बिल्डराच्या घशात घालण्यासाठी काही लोकांकडून या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचा आरोप नगरसेवक आबा बागुल यांनी केला. 
महापालिकेच्या वतीने व बागुल यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान आणि सोलर रुफ पॅनल पार्किंग उभारणार आहे. परंतु सोलर रुफ पॅनल पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करणार असल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक संजय जगताप यांनी विरोध केला आहे. तसेच यासाठी नागरिकांची सह्याची मोहीम घेऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आबा बागुल यांनी पत्रकर परिषद घेऊन प्रकल्पाची माहिती दिली. बागूल यांनी सांगितले की, महापालिकेकडून हिल टॉप हिलस् अतंर्गत आरक्षण टाकले आहे. या १०७ एकर जागेपैकी काही जागेबाबत न्यायालयात वाद सुरु आहेत. परंतु यापैकी सुमारे ७० एकर जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात असून, अन्य शिल्लक जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु ही शिल्लक जागा बिल्डराच्या घशात घालण्यासाठी संबंधित नगरसेविकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप बागुल यांनी केला. तसेच श्रेयवादासाठी पुणेकरांच्या, पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचे बागुल यांनी सांगितले.
तळजाई टेकडीवर प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी सर्व प्रशासकी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मे अखेर पर्यंक काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु जगाताप यांच्याकडून वारंवार करण्यात येत असलेल्या विरोधामुळे काम रखडले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आता पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे बागुल यांनी स्पष्ट केले.
--
झाडांची कत्तल करून जाळलेले फोटो बोगस
तळजाई टेकडी येथील झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात झाडे जाळण्यात आल्याचे फोटोचे बॅनरबाजी करून नागरिकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. परंतु झाडे जाळलेल्याची फोटो बोगस असून, नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून नक्की झाडे तोडली का, ती जाळण्यात आली का, कोणी हा प्रकार केला याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. 

Web Title: Ghazal to build the place of Taljai hill in the throes of the builder: Aba Bagul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.