शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुल्कवाढी विरोधात 'घंटानाद आंदोलन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:03 IST

आपापली अभ्यासाची कामे करत करत २४ तास विद्यार्थी आंदोलनात सहभागी...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाढवलेल्या भरमसाठ शुल्काविरोधात विद्यार्थ्यांनी आजपासून बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. शेवटी आजपासून सर्व विद्यार्थी मिळून त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुख्य इमारत आवारातील संविधान स्तंभाजवळ बेमुदत घंटानाद आंदोलनास बसले आहेत.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने फक्त पीएच.डी.च्या कोर्सचेच शुल्क पूर्ववत केले आहे. मात्र उर्वरित शुल्क जैसे थेच आहे.

कुलसचिवांनी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिली असता विद्यार्थ्यांनी दिलेल्या संपूर्ण निवेदनाची आणि मागण्यांची त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून झालेली भरमसाठ शुल्कवाढ जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर सर्व आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना ठाम आहेत. आपापली अभ्यासाची कामे करत करत २४ तास विद्यार्थी आंदोलनात सहभागी असणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :

१) पदव्युत्तर पदवीची शुल्कवाढ पूर्ववत करणे.२) वसतिगृहाची शुल्कवाढ पूर्ववत करणे.३) विद्यापीठाशी संलग्नित संशोधन केंद्रांचे शुल्क हे विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे.४) संशोधक विद्यार्थ्यांचे वसतिगृह  लवकरात लवकर चालू करणे.५) पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची बंद केलेली अधिछात्रवृत्ती सरसकट पुन्हा चालू करणे.६) अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्याच जागेवर तत्काळ सुरू करणे.

विद्यापीठ प्रशासनाने भरमसाठ केलेली शुल्क त्वरित मागे घ्यावी. जोपर्यंत शुल्क पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील

- पौर्णिमा गायकवाड, विद्यार्थिनी

जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत तोपर्यंत आम्ही भरपावसात २४ तास आंदोलन करणार आहोत.- तुषार पाटील निंभोरेकर, विद्यार्थी

विद्यापीठ प्रशासनाने केलेली शुल्कवाढ ही फार चुकीची पद्धतीची आहे. कोणत्याही प्रकारचे विद्यार्थीहित या शुल्कवाढीमध्ये नसून गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

- तुकाराम शिंदे, विद्यार्थी

 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठagitationआंदोलन