शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील नवीन ऑटो रिक्षा परवान्यासाठी फेब्रुवारीपर्यंतच्या अपॉईंटमेंट फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 18:03 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाही वर्षांपुर्वी हे परवाने देणे राज्य शासनाने केले होते बंद अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांची कागदपत्रे जुलै महिन्याच्या आतच तपासणी करून दिली जाणार

पुणे : नवीन ऑटोरिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कागदपत्र तपासणीसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातील अपॉईंटमेंट मिळत आहेत. त्यामुळे त्यामुळे इच्छुकांना परवान्यासाठी ८ ते ९ महिने वाट पाहावी लागत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, हा विलंब टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन वेळापत्रक तयार केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. काही वर्षांपुर्वी हे परवाने देणे राज्य शासनाने बंद केले होते. त्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या सुमारे ४५ हजारापर्यंत खाली आली होती. नवीन परवाने सुरू झाल्यानंतर इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जात आहेत. त्यामुळे शहरातील रिक्षांचा आकडा ७० हजारांपर्यंत पोहचला आहे. अजूनही परवान्यासाठी अर्जदारांची ‘आरटीओ’ रांग लागली आहे. नवीन परवान्यासाठी अर्ज करणाºया अर्जदारांना त्यांची कागदपत्रे आरटीओकडे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे तपासणीनंतर परवान्याचा निर्णय घेतला जातो. मात्र त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागत आहे. त्यासाठीचा दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यालयात कागदपत्रे सादर करावी लागतात. पण सध्या अर्जदारांना पुढील वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील अपॉईंटमेंटच्या तारखा मिळत आहेत. त्यामुळे परवान्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. यापार्श्वभुमीवर आरटीओने हा विलंब टाळण्यासाठी विशेष मोहित हाती घेतली आहे. ऑनलाईन पध्दतीने अपॉईंटेमेंट घेतलेल्या अर्जदारांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकामुळे मे २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांची कागदपत्रे जुलै महिन्याच्या आतच तपासणी करून दिली जाणार आहेत. अर्जदारांनी नवीन वेळापत्रकानुसार सकाळी १०.३० ते १२ या वेळेत आरटीओ, कार्यालयात उपस्थित राहून कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.---नवीन वेळापत्रकऑनलाईन अपॉईंटमेंटचा महिना    विशेष मोहिमेअंतर्गत वेळापत्रकमे २०१९                                                    १३ ते १७ मेजून २०१९                                                २० ते २४ मेजुलै २०१९                                               २७ मे ते १ जूनऑगस्ट २०१९                                        ३ ते ७ जूनसप्टेंबर २०१९                                         १० ते १५ जूनऑक्टोबर २०१९                                     १७ ते २१ जूननोव्हेंबर २०१९                                          २४ ते २९ जूनडिसेंबर २०१९                                         १ ते ६ जुलैजानेवारी २०२०                                        ८ ते १२ जुलै

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीस