शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'लोकांपर्यंत चिन्ह अन् उमेदवार पोहोचवा...'; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 11:00 IST

तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. शदर पवार यांनी आज बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

देशात याआधी असं घडलं नाही की, ज्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलं. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढलो. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या. कोणाला वाटत असेल चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल. मात्र असं कधी होत नसतं, असं शरद पवारांनी सांगितलं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना विश्वास द्या, यश नक्की मिळेल, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या. 

...म्हणून राष्ट्रवादी अजित पवारांची

अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिबा आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेतही ४१ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते. पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्षनेतृत्त्वाची रचनेवर पक्ष कुणाचा, याचा निर्वाळा देता येणार नाही. बहुमताच्या निकषानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.

बाटली तीच औषध फक्त नवीन...

बाटली तीच औषध फक्त नवीन...आम्ही खरं आहे ते बोललो. पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली. मग हे नाटक कशाला करायचे?, असा निशाणा रोहित पवारांनी साधला. भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडले. विधानसभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला.ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाही. पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत. २०२४ साली भाजपा आल्यावर संविधान राहणार नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार