शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागा : खासदार सुप्रिया सुळे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांना बरोबर घेत गावपातळीपर्यंत पोचलेला पक्ष आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार व सन्मान ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांना बरोबर घेत गावपातळीपर्यंत पोचलेला पक्ष आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार व सन्मान करीत असताना पराभूत उमेदवारांनाही वाटचालीसाठी ताकत दिली जाईल. ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले आहेत, त्या ठिकाणचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाला लागावे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वांनी तयारीला लागावे. पक्ष सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सासवड (ता. पुरंदर) येथील जयदीप मंगल कार्यालयात नवनिर्वाचित ग्रामपंचायती सदस्यांच्या सत्कारावेळी खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या. खासदार सुळे पुढे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात नंबर एक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कळावा, पंचायत राजच्या योजना, नव्या शासन योजना व एकूणच कामात मदत होण्यासाठी नूतन ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आपण पुढाकार घेणार आहोत. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनाली खेडेकर, अजिंक्य टेकवडे, सौरभ कुंजीर, शेखर पिसे, संभाजी कोलते यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर जिल्हा नियोजन समितीवर राज्यशासनाने नियुक्त केलेले निवृत्ती बांदल, माणिकराव झेंडे पाटील यांचा विशेष सत्कार झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत नवनियुक्त पदाधिकारी यांचा पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, तात्या भिंताडे, पुष्कराज जाधव, संदेश पवार, भरत झांबरे, शिवाजी पोमण, राहुल गिरमे, बंडुकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, गौरी कुंजीर, ऋतुजा धुमाळ, पूजा भिंताडे आदी अनेक मान्यवर व गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरंदर तालुका समन्वयक म्हणून माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भैयासाहेब खाटपे, जिल्हा रा. काँ. युवक उपाध्यक्ष अक्षय निगडे, पुरंदर तालुका रा. काँ. सरचिटणीस विष्णू गडदरे, नीरा रा. काँ. शहराध्यक्ष प्रमोद काकडे, नीरा शहर रा.काँ. युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे, नीरा शहर महिला रा.काँ अध्यक्ष तनुजा शहा, नीरा शहर उपाध्यक्ष अजय राऊत यांना खा.सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, युवकाध्यक्ष पुष्कराज जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रास्ताविक माणिक झेंडे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर यांनी केले तर, आभार युवकाध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी मानले.

सासवड (ता. पुरंदर) येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भैयासाहेब खाटपे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.