ग्रामपंचायत निवडणूकीच्या तयारीला लागा: पासलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST2020-12-07T04:07:34+5:302020-12-07T04:07:34+5:30
चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भगवा ...

ग्रामपंचायत निवडणूकीच्या तयारीला लागा: पासलकर
चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे .तसेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या योजना जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची कामे शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी जोमाने करावीत . पक्षसंघटना वाढविण्याकरिता गावागावात जाऊन संपर्क करण्याचे आवाहन पासलकर यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, देविदास धुमाळ, प्रदीप धुमाळ, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, समीर भोईटे, वैभव शितोळे, तसेच सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, वार्ड शाखाप्रमुख, शिवसैनिक व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ०६ केडगाव
चौफुला तालुका दौंड येथील बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महेश पासलकर