ई-संजीवनीद्वारे घ्या घरबसल्या सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:46+5:302020-12-02T04:07:46+5:30
पुणे : केंद्र सरकारच्या ‘ई-संजीवनी ओपीडी’ या ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या वैद्यकीय सल्ला देणाऱ्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक ...

ई-संजीवनीद्वारे घ्या घरबसल्या सल्ला
पुणे : केंद्र सरकारच्या ‘ई-संजीवनी ओपीडी’ या ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या वैद्यकीय सल्ला देणाऱ्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी केले आहे. ई-प्रिस्क्रिप्शनद्वारे डॉक्टरांनी सांगितलेली औषधे सरकारी रुग्णालयात मोफत मिळतील, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात विविध आजारांसाठी नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ई-संजीवनी ओपीसी ही ऑनलाईन सेवा सुरू केली. त्याचे स्वतंत्र अॅपही आहे. लिंक किंवा अॅपवर राज्य निवडता येते. रुग्णाची माहिती भरल्यानंतर टोकन क्रमांक मिळतो. त्यानुसार दिलेल्या वेळेत डॉक्टरांशी ऑनलाईन संपर्क साधता येतो. सकाळी ९.३० ते दुपारी दीड आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ही सुविधा उपलब्ध आहे. रविवारी ही सेवा बंद असते, अशी माहिती नांदापुरकर यांनी दिली.