जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये परदेशी स्ट्रेनचा नाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST2021-02-20T04:28:57+5:302021-02-20T04:28:57+5:30

पुण्यासह अमरावती, सातारा, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ही कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे, याची ...

Genome sequencing does not involve foreign strains | जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये परदेशी स्ट्रेनचा नाही समावेश

जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये परदेशी स्ट्रेनचा नाही समावेश

पुण्यासह अमरावती, सातारा, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ही कोरोना रुग्णसंख्या का वाढत आहे, याची कारणमीमांसा करण्यासाठी तसेच येथे परदेशातील स्ट्रेन आहे का, याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाला या जिल्ह्यांतील नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अथिरा जयराम, डॉ. व्ही. सुषमा व डॉ. स्मृती शेंडे यांनी या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये सहभाग घेतला.

पुण्यासह अमरावती, सातारा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील कोरोनाच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने केले. यापैकी कोणत्याही ठिकाणी यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका येथील नवीन घातक स्ट्रेन आढळून आले नाही. यामुळे, सध्या तरी महाराष्ट्रात परदेशात म्युटेशन झालेला (जनुकीय रचनेत बदल झालेले) स्ट्रेन आढळलेला नाही.

सिक्वेन्सिंगमध्ये पुण्यातील १२ तर अमरावती, सातारा आणि यवतमाळ या जिल्हयांतील प्रत्येकी ४ अशा प्रकारे २४ नमुन्यांचा समावेश होता. सर्व ठिकाणचे नमुने दोन आठवड्यांपूर्वीचे असून त्यांचे सिक्वेन्सिंग बंगरूळू येथे जाऊन करण्यात आले. या सर्व जिल्ह्यांत अपवाद वगळता प्रचलित स्ट्रेन आढळून आलेले आहेत. हे स्ट्रेन लोकल असून त्यांच्यापासून वेगळा काही धोका नसल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे व उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

Web Title: Genome sequencing does not involve foreign strains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.