शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य नागरिकांना मास्कची अजिबात आवश्यकता नाही : महापालिका आरोग्य विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:25 IST

‘कोरोना’चा एकही रुग्ण पुण्यात नाही : घाबरू नका, पण खबरदारी घ्या

ठळक मुद्दे‘कोरोना’सारखा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी जे ‘एन-९५’ या मास्कची आवश्यकता

पुणे : महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये दाखल असलेले परदेशी नागरिक हे ‘कोरोना’बाधित नसून, त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरच काय पण महाराष्ट्रात ‘कोरोना’चा संसर्ग झालेली एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ‘कोरोना’ला घाबरून विनाकारण सर्वसामान्य नागरिकांनी मास्क घालून फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. डॉ. नायडू रुग्णालयामध्ये आजपर्यंत परदेशातून आलेल्या ज्या ८५ संशयित  नागरिकांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी कोणालाही ‘कोरोना’चा संसर्ग झालेला नसल्याचे आढळून आल्याने, त्यांना तपासणीनंतर घरीही सोडण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत बाजारात ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात उपलब्ध असलेले मास्क हे अतिशय बेसिक असून, त्याची किंमत केवळ दीड ते दोन रुपये एवढी आहे. मात्र ‘कोरोना’च्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याची अफवा पसरविल्यामुळे हे दीड दोन रुपयांचे मास्कही आजमितीला वीस ते पंचवीस रुपयांना विकले जात आहेत. मुळात हे मास्क अतिशय बेसिक असून, त्याच्या वापराने नगण्य असाच संसर्ग रोखला जाऊ शकतो. ‘कोरोना’सारखा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी जे ‘एन-९५’ या मास्कची आवश्यकता आहे. हे मास्क सध्या बाजारात कुठेच नसून, केवळ आरोग्य प्रशासनाने हे मास्क आपल्या रुग्णालयात, म्हणजे जेथे ‘कोरोना’संशयित रुग्ण दाखल केले जात आहे. तेथील रुग्ण हाताळणाऱ्या डॉक्टर व संबंधित यंत्रणेकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत. ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून जी मास्क खरेदी केली जात आहे ती अनावश्यक बाब असून, या मास्कपेक्षा खबरदारी घेणाऱ्या व्यक्तीने स्वत:कडील रुमालाचा वापर केला तरी खूप आहे. बाजारात उपलब्ध असलेले हे मास्क एकदा वापरल्यावर फे कून देण्याच्या दर्जाचे आहेत़ त्यामुळे हे मास्क वापरल्यावर संबंधित व्यक्तीकडून रस्त्यावर कुठेही टाकले जातात़ परिणामी त्या व्यक्तीचा केवळ सर्दी खोकल्याचा संसर्ग मात्र पसरत जाण्याची भीती आहे़ रुग्णांना जे वैद्यकीय सेवा देतात, रुग्ण हाताळतात यांनीच फक्त मास्क वापरणे अपेक्षित आहे़ सर्वसामान्य नागरिकांनी विनाकारण मास्क वापरू नये़ सर्दी खोकला झाला तर खबरदारी म्हणून रूमाल वापरा पण घाबरून जाऊ नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका