शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव येथील जनरल मोटर्स कंपनीने तब्बल १४१९ कर्मचाऱ्यांना कामबंदीची नोटीस ; कामगार संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 18:15 IST

कोरोना उद्रेकाचे व आर्थिक नुकसानीचे कारण देत घेतला निर्णय; हा ले ऑफ बेकायदेशीर असल्याचा कामगार संघटनांचा दावा..

पिंपरी : जनरल मोटर्स कंपनीने १४१९ कामगारांना कामावरून कामबंदीची नोटीस दिली असल्याचे कामगार आयुक्तालयाला कळविले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील वाद चिघळणार आहे. कामगारांना योग्य भरपाई न मिळाल्यास कामगार न्यायालयात जाणार असल्याची भावना कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

जनरल मोटर्स इंडिया लिमिटेडने तळेगाव औद्योगिक क्षेत्रात ऑटोमोबाईल वाहने आणि पॉवर ट्रेन इंजिन प्रकल्प उभारला होता. येथील उत्पादन २० डिसेंबर २०२० रोजी थांबविण्यात आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये वाद सुरू आहेत. या वादावर तोडगा न निघाल्याने जनरल मोटर्स कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापक बिना कोठाडिया यांनी औद्योगिक विवाद नियम १९५७ अंतर्गत १४१९ कामगारांना १६ एप्रिल २०२१ पासून कामावरून कमी केल्याचे पत्र अप्पर कामगार आयुक्तांना दिले आहे. औद्योगिक अधिनियमांतर्गत कामगारांना भरपाई मिळण्याचा हक्क आहे. त्यांना नियमाप्रमाणे भरपाई दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जनरल मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे म्हणाले, कामगारांना विश्वासात न घेता, त्यांचे भविष्य सुरक्षित न करता जानेवारी २०२०मध्ये चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सला कंपनी विकली. गेल्या वर्षभरापासून कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर वेगानं दिले जात नाही. कामबंदीची नोटीस दिली हा दबावतंत्राचा भाग आहे.----कामगारांना कामावरून कमी करण्याची दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे. त्या बाबत येत्या गुरुवारी (दि २२) अप्पर कामगार आयुक्तांसमवेत बैठक होणार आहे. नव्याने येणाऱ्या कंपनीमध्ये आम्हाला सामावून घ्यावे हीच आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा आश्वासन दिल्या प्रमाणे कामगारांना आतापर्यंतची सर्वोच्च नुकसान भरपाई द्यावी. कंपनीच्या प्रस्तावानुसार प्रत्येक कामगाराला जास्तीत जास्त दहा-बारा लाख रुपये मिळतील. ते आम्हाला मान्य नाहीत. योग्य तोडगा न निघाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ.संदीप भेगडे, अध्यक्ष, जनरल मोटर्स कामगार संघटना----

कंपनी काय म्हणते..जनरल मोटर्स कंपनीने व्यवसायात तोटा झाल्याने २०१७ साली भारतातील स्थानिक विक्री आणि कामकाज बंद केले. प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परदेशी बाजारासाठी वाहने तयार करण्यावर भर दिला. परदेशी बाजारपेठेतील मागणीतही घट झाली. मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर आणखी परिणाम झाला. अडचणीच्या काळातही कामगारांचे वेतन दिले. वेतनावर दरमहा दहा कोटी रुपयांहून अधिक खर्च आहे. कंपनीकडे डिसेंबर २०२० पासून कोणतीही मागणी नाही. तसेच असेंम्बली कामही नाही. बाजारपेठेतील मागणी घसरल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कामगारांना ले ऑफ भरपाई मिळण्याचा अधिकार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक बिना कोठाडिया यांनी सांगितले.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी