शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

गीतरामायण महाराष्ट्र विसरणार नाही - राजदत्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:39 IST

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या काव्यरचना म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांच्या कविता व गीतरामायण महाराष्ट्र विसरू शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना साहित्याची झालर सांभाळावी लागत असल्याने पहिल्यापासूनच साहित्याचे आकर्षण होते. मी ग. दि. माडगूळकरांच्या वैचारिक तालमीत वाढलो असून, त्यांच्याच नावाने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना देहाचे मंदिर झाल्याची भावना मनात येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी मंगळवारी येथे केले.

भोसरी : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या काव्यरचना म्हणजे दैवी देणगी आहे. त्यांच्या कविता व गीतरामायण महाराष्ट्र विसरू शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करीत असताना साहित्याची झालर सांभाळावी लागत असल्याने पहिल्यापासूनच साहित्याचे आकर्षण होते. मी ग. दि. माडगूळकरांच्या वैचारिक तालमीत वाढलो असून, त्यांच्याच नावाने जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना देहाचे मंदिर झाल्याची भावना मनात येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी मंगळवारी येथे केले.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने २४व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव पार पडला. या महोत्सवात राजदत्त यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना गदिमा चित्रमहर्षी पुरस्कार, प्रसिद्ध लोककलावंत रेश्मा मुसळे यांना गदिमा लोककला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते कविता महोत्सवाचे उद्घाटन झाले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी स्वागत केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल गिरीश मालपाणी उपस्थित होते.या वेळी सुशीलकुमार शिंदे यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’, अरुण इंगवले यांचा ‘आबूट घेºयातला सूर्य’ सागर काकडे यांचा ‘माणसाच्या सोईचा देव’, कविता शिर्के-कडलक यांचा ‘बाईपणाची जमीन’ या कवितासंग्रहांचा गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या भारतरत्न या पुस्तकास मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिले.भोसरीतील संत साई इंग्लिश मीडिअम स्कूल व इंद्रायणीनगर येथील श्री टागोर माध्यमिक विद्यालयास गदिमा संस्कारक्षम शाळा हा सन्मान दिला. ग्राफ फायर इंडस्ट्रीजचे गजानन चरपे व प्रगती इंजिनिअरिंगचे लक्ष्मण काळे यांना महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.विठ्ठल वाघ : कवी मानवतावादी असतोग. दि. माडगूळकरांच्या स्मृती जपणे सोपे काम नाही. गदिमांच्या स्मृती जपणाºया कवींचा आपल्याला अभिमान वाटतो, असे सांगत प्रा. मिलिंद जोशी यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्याला आलेल्या जीवनानुभवातून कवितेचा उगम होतो. कवी हे समाजाचे विदारक चित्र कवितेच्या माध्यमातून समाजाला रुचेल त्या भाषेत मांडत असतात. गदिमांचा वारसा चालवणे अवघड गोष्ट आहे. गदिमांचा प्रत्येक शब्द पुढच्या पिढ्यांसाठी भक्कम पाठीराखा आहे, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगितले. या वेळी मेघराज राजेभोसले, भाऊसाहेब भोईर यांनीही विचार मांडले.डॉ. विठ्ठल वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात कवी कोणत्या विशिष्ट जातीचा नसतो आणि कवीला कोणता धर्मही नसतो. निर्गुण निराकार ईश्वराचा अंश हा कवी असून, जे वास्तव आहे ते त्याच्या कवितेतून येते. कवी केवळ मानवतावादी असतो. त्याच्याकडे निस्सीम माणुसकी असते आणि त्या माणुसकीत कोणत्याही जाती अथवा धर्माला थारा नसतो. आपल्या ‘वेदान्त’ व ‘नर्तन’ या दोन कवितांचे सादरीकरणही त्यांनी या वेळी केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणे