गाड्या अडवून लूटमार करणारे गजाआड

By Admin | Updated: September 15, 2015 04:33 IST2015-09-15T04:33:46+5:302015-09-15T04:33:46+5:30

राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण महामार्ग) वर गेल्या ६ महिन्यांपासून गाड्या अडवून लूट करणाऱ्यांना ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी व महामार्गावर

Gaza Hade, who looted cars | गाड्या अडवून लूटमार करणारे गजाआड

गाड्या अडवून लूटमार करणारे गजाआड

ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण महामार्ग) वर गेल्या ६ महिन्यांपासून गाड्या अडवून लूट करणाऱ्यांना ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी व महामार्गावर नाकेबंदी करून गाडीचा पाठलाग करत पकडले. सिनेस्टाईल कामगिरी करून ओतूर पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना गजाआड केले.
काही दिवसांपासून माळशेज घाटात लूटमार सुरू होती. परंतु ज्यांची लूटमार झाली ते फिर्याद देण्यास अथवा पोलिसांना कळविण्यास घाबरत होते. नंतर काही दिवसांनी या घटना समजत; परंतु वेळ निघून गेलेली असे. या लुटारू टोळीचा शोध घेण्यासाठी कर्मचारी रात्री गस्तीवर असत. दि. १३ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मढ (ता. जुन्नर) गावचे हद्दीत कोंबड्या भरलेली पिकअप जीप नं. (एम.एच.०४ डी.एस.२६४४ ) कल्याणकडे जात होती.
मढ गावच्या हद्दीत ती आली असताना रस्त्यावर सॅन्ट्रो कार क्र. (एम.एच.०६ ए.बी.२२७८ ) उभी होती व थोड्या अंतरावर लुटारू उभे होते. त्यांनी पिकअप जीपच्या चालकास हात दाखवून गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. जीप चालकाला दमदाटी केली. जबरदस्तीने जवळ असणारी सर्व रोख रक्कम, खिशातील साहित्य, पावत्या काढून पिकअपमधील कोंबड्या काढून घेतल्या.
पिकअपचा चालक हजरत अली ऊर्फ फंदा यांनी ओतूर पोलिसांना या लुटीची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले यांनी जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा येथील पोलिसांना माहिती देऊन त्वरित नाकेबंदी करण्यास सांगितले. ते स्वत: नगर-कल्याण महामार्गाने या मार्गावर मढ गावचे दिशेने निघाले, पोलिसांनी गाडीवरील सरकारी वाहनाचा अंबर दिवा बंद केला. पोलिसांची गाडी या अज्ञात लुटारूंनी अडविली. तेव्हा ही पोलीस गाडी आहे, हे लुटारुंच्या लक्षात आले. तिघे लुटारू सॅन्ट्रो कार क्र. (एम.एच.०६ ए.बी. २२७८) मध्ये बसून जुन्नरच्या दिशेने वेगात जाऊ लागले. पाठलाग सुरू असताना जुन्नर येथे नाकाबंदीसाठी तैनात असलेले पो.स.इ.राकेश कदम यांना त्वरित माहिती दिली, तेही मढ कडून येणाऱ्या जुन्नर रस्त्यावर नाकाबंदी करणारे पोलीस पथक घेऊन थांबले होते. ओतूर पोलीस या गाडीचा पाठलाग करीत होते. या लुटारूंची सॅँट्रो कार जुन्नर येथील शिवाजी चौकात दोन्ही पोलिसांनी पकडली. (वार्ताहर)

Web Title: Gaza Hade, who looted cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.