गावडेवाडी सरपंंचपदी छाया गावडे
By Admin | Updated: August 22, 2015 01:59 IST2015-08-22T01:59:29+5:302015-08-22T01:59:29+5:30
आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव)च्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या छाया आनंदराव गावडे सरपंचपदी व उपसरपंचपदी लता दत्तात्रय जारकड

गावडेवाडी सरपंंचपदी छाया गावडे
अवसरी : आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव)च्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या छाया आनंदराव गावडे सरपंचपदी व उपसरपंचपदी लता दत्तात्रय जारकड यांना प्रत्येकी ६ मते पडल्याने गावडेवाडी गावात पुन्हा एकदा भगवा फडकला.
सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी सकाळी पार पडली. या वेळी सरपंचपदासाठी तीन अर्ज आणि उपसरपंचपदासाठीही ३ अर्ज आले. त्यानंतर प्रत्येकी एकाने माघार घेतली.
शिवसेनेच्या वतीने सरपंचपदासाठी छाया आनंदराव गावडे आणि राष्ट्रवादीतर्फे सविता राजेंद्र गावडे यांच्यात मतदान होऊन ११ पैकी ६ मते छाया गावडे यांना पडल्याने छाया गावडे यांची सरपंचपदी निवड झाली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेच्या वतीने लता दत्तात्रय जारकड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब चिमाजी गावडे यांच्यात मतदान होऊन लता जारकड यांना ६ मते मिळून त्यांची उपसरपंचपदी निवड झाली.
नवनिर्वाचित शिवसेनेचे सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच देवराम गावडे, संतोष गावडे, शाखाप्रमुख विजय गावडे, सुरेश तळेकर, विकास गावडे, रामचंद्र गावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन केला. मतदानाप्रसंगी केरभाऊ गावडे, मयूर शिंदे, आशा तळेकर, संतोष गावडे, बाबाजी टेमकर, बाळासाहेब गावडे, ज्योती जारकड, सविता गावडे, वनिता गावडे यांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. भोर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तलाठी एस. एस. गायकवाड, ग्रामसेविका ए. एम. पाटोळे यांनी काम पाहिले. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)