नगराध्यक्षपदी गावडे निश्चित

By Admin | Updated: June 9, 2015 05:06 IST2015-06-09T05:06:33+5:302015-06-09T05:06:33+5:30

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनीषा राजेंद्र गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बारा जूनला गावडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

Gawde confirmed as city president | नगराध्यक्षपदी गावडे निश्चित

नगराध्यक्षपदी गावडे निश्चित

शिरूर : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनीषा राजेंद्र गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बारा जूनला गावडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. १७ पैकी ९ महिला नगरसेवक आहेत. आघाडीचे प्रमुख रसिकलाल धारिवाल, अध्यक्ष केशरसिंग परदेशी, नेते माऊली पठारे, व सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी सुरुवातीलाच पाच वर्षांत सहा महिलांना अध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०११ पासून आजपर्यंत उज्ज्वला बरमेचा, अलका सरोेदे, सुवर्णा लटांबळे व सुनीता कालेवार यांना संधी मिळाली. पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती. नंतरची अडीच वर्षे इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहेत. या अडीच वर्षात प्रथम कालेवार यांना १० महिन्यांचा कालावधी मिळाला. कालेवार यांनी २५ मे ला राजीनामा दिला. घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, मावळत्या नगराध्यक्षा सुनीता कालेवार, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुवर्णा लटांबळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, महेंद्र मल्लाव, दादाभाऊ वाखारे, संतोष भंडारी, विजय दुगड, प्रवीण दसगुडे, आबीद शेख, अशोक पवार, सुवर्णा लोळगे, शैला साळवे, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, शिक्षण मंडळाचे सभापती संतोष शितोळे, उपसभापती रूपेश गंगावणे आदी या वेळी उपस्थित होते.
------------------
नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आज उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा दिवस होता. यासाठी आघाडीच्या नेत्यांनी गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आज गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गावडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सोनप्पा यमगर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Gawde confirmed as city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.