शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

गवार, शेवगा, वाटाणा कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 02:41 IST

गवार ५०००, शेवगा ६०००, तर वाटाणा १०,००० रुपये क्विंटल; कांदा गडगडला

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये गवार, शेवगा व वाटाण्याचे भाव कडाडले. गवारीला ५०००, शेवग्याला ६०००, तर वाटाण्याला १०,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. टोमॅटोची ९४० क्रेट्स, तर हिरव्या मिरचीची ४१० पोती आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव घसरले.मेथी, कोथिंबिरीची आवक वाढली. मेथी, शेपू, कोथिंबिरीच्या भावात वाढ झाली. कांदा-बटाट्याच्या बाजारात कांद्याची आवक ५२३ क्विंटलने वाढून भाव ४०० रुपयांनी गडगडले. कांद्याला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्या, म्हशी व बैलांची विक्री वाढली. बाजार समितीमध्ये एकूण दोन कोटी पंचाऐंशी लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ११२८ क्विंटल होऊन कमाल भाव १६०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ५६५ क्विंटल होऊन बटाट्याचा कमाल भाव २२०० रुपये झाला. बटाट्याची आवक १३३० क्विंटलने घटली. भुईमूग शेंगाची १० क्विंटल आवक झाली असून भुईमूग शेंगांना ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लसणाची एकूण ४ क्विंटल आवक झाली. लसणाची आवक तीन क्विंटलने घटली. लसणाचा कमाल भाव १८०० रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४१० पोती आवक झाली. मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव :कांदा - एकूण आवक - ११२८ क्विंटल. भाव क्रमांक १ : १६०० रुपये, भाव क्रमांक २ : १३५० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये. बटाटा - एकूण आवक - ५६५ क्विंटल. भाव क्रमांक १ : २२०० रुपये, भाव क्रमांक २ : १८०० रुपये, भाव क्रमांक ३ : १२०० रुपये. भुईमूग शेंग - एकूण आवक - १० पोती, भाव क्रमांक १: ४५०० रुपये, भाव क्रमांक २ : ४००० रुपये, भाव क्रमांक ३ : ३५०० रुपये. लसूण - एकूण आवक - ४ क्विंटल. भाव क्रमांक १ : १८०० रुपये, भाव क्रमांक २ : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.पालेभाज्या :पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव : -मेथी - एकूण १६४२५ जुड्या (७०० ते १४०० रुपये), कोथिंबीर - एकूण १५४२० जुड्या (७०० ते १२०० रुपये), शेपू - एकूण ४२८० जुड्या (५०० ते १००० रुपये), पालक - एकूण ३२२५ जुड्याफळभाज्या :फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव रुपयांत असे :टोमॅटो - ९४० पेट्या (७०० ते १२००), कोबी - ३२४ पोती (२०० ते ६००), फ्लॉवर - ३१० पोती (७०० ते १२००), वांगी - २९५ - पोती (३००० ते ४०००), भेंडी - ३२५ डाग (३००० ते ४०००), दोडका - २७० पोती (१५०० ते ३००० ), कारली - ३१५ डाग (१५०० ते ३०००), दुधीभोपळा - २२५ पोती (८०० ते १६००), काकडी - २८५ पोती (८०० ते १५००), फरशी - ११० पोती (३००० ते ४०००), वालवड - २०५ पोती (३००० ते ४०००), गवार - ८० पोती (४००० ते ५०००), ढोबळी मिरची - ४९७ डाग (१००० ते २०००), चवळी - १४० पोती (१००० ते २०००), वाटाणा - ३५ पोती (८००० ते १०,०००), शेवगा - ७० डाग (४००० ते ६००० रुपये). 

टॅग्स :vegetableभाज्याChakanचाकणMarketबाजार