गौरव टाव्हरेचा ग्रामस्थांतर्फे गौरव
By Admin | Updated: June 6, 2015 22:01 IST2015-06-06T22:01:47+5:302015-06-06T22:01:47+5:30
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) घुलेवस्ती येथील गौरव प्रकाश टाव्हरे यूपीएससीतर्फे घेतली

गौरव टाव्हरेचा ग्रामस्थांतर्फे गौरव
अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) घुलेवस्ती येथील गौरव प्रकाश टाव्हरे यूपीएससीतर्फे घेतली जाणारी सीडीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल गौरव टाव्हरे यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
यूपीएससीतर्फे आॅक्टोबर २०१४मध्ये सीडीएस परीक्षा घेण्यात आली. देशभरातून परीक्षेसाठी २ लाख ८० हजार विद्यार्थी बसले होते. त्यांतून ४ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरतात. त्यांना एएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यातून १३६ जणांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात आली. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये गौरव टाव्हरे ७४व्या स्थानावर आहे. जुलै महिन्यात डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत दीड वर्षाच्या सैनिकी प्रशिक्षणासाठी गौरव जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०१६मध्ये गौरव सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्त होणार आहे.
गौरवचे वडील फळविक्रेते, तर आई गृहिणी आहे. गौरवचे लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान अवसरी बुद्रुक यांच्या वतीने अभिनंदन
करण्यात आले. (वार्ताहर)