गौरव रायते, वर्षा राजखोवा विजेते
By Admin | Updated: March 18, 2015 00:46 IST2015-03-18T00:46:42+5:302015-03-18T00:46:42+5:30
सिंहगड महाविद्यालयाचा गौरव रायते व फर्ग्युसन महाविद्यालयाची वर्षा राजखोवा यांनी अनुक्रमे ‘मिस्टर अॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’चा किताब पटकावला.

गौरव रायते, वर्षा राजखोवा विजेते
पुणे : लोकमत व रांका ज्वेलर्स यांच्या वतीने कुमार पॅसिफिक मॉल येथे आयोजित ‘मिस्टर अॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’ स्पर्धेत सिंहगड महाविद्यालयाचा गौरव रायते व फर्ग्युसन महाविद्यालयाची वर्षा राजखोवा यांनी अनुक्रमे ‘मिस्टर अॅण्ड मिस युवा नेक्स्ट २०१५’चा किताब पटकावला.
स्पधेर् वेळी रांका ज्वेलर्सचे महासंचालक तेजपाल रांका, कुमार पॅसिफिक मॉलचे आॅपरेशन मॅनेजर मंकेश्वर पांडे, परीक्षक ‘आजोबा’फेम कॉस्च्यूम डिझायनर नमिता गोगटे, चेतन अग्रवाल, राजेश कुमार आदी उपस्थित होते. नितू भाटिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या वेळी रांका म्हणाले, ‘‘तरुणांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्टने मिळवून दिलेले हे एक व्यासपीठ आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी ही एक मोठी संधी आहे.’’
रविवारची सुटी असल्याने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. पुण्याच्या विविध भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
(प्रतिनिधी)