पुण्यातील १२ पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

By Admin | Updated: January 25, 2017 01:42 IST2017-01-25T01:42:31+5:302017-01-25T01:42:31+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामे केल्याबद्दल पुणे शहर व जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने गौरिवण्यात आले आहे.

Gaurav, the President's Medal of 12 police in Pune | पुण्यातील १२ पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

पुण्यातील १२ पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामे केल्याबद्दल पुणे शहर व जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने गौरिवण्यात आले आहे. मंगळवारी याची घोषणा करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी राष्ट्रपती पदक मिळालेल्यांचे अभिनंदन केले़
वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील खळदकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग गायकवाड, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सीमा महेंदळे, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय नाईक पाटील, विशेष शाखेचे उपनिरीक्षक बाळासाहेब भोर, गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार अजिनाथ वाकसे, समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बळवंत यादव, विशेष शाखेतील पोलीस हवालदार अशोक कांबळे, सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास घोरगे यांना हा राष्ट्रपती पदक सन्मान जाहीर करण्यात आला आला आहे.

Web Title: Gaurav, the President's Medal of 12 police in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.