काळेवाडीत साडेसात लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: December 6, 2014 04:01 IST2014-12-06T04:01:59+5:302014-12-06T04:01:59+5:30

पाळत ठेवून केलेल्या कारवाईत अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या संयुक्त कारवाईत काळेवाडी येथून साडेसात लाख रुपयांचा गुटखा जप्त

Gatka seized for seven hundred million in Kalewadi | काळेवाडीत साडेसात लाखांचा गुटखा जप्त

काळेवाडीत साडेसात लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी : पाळत ठेवून केलेल्या कारवाईत अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या संयुक्त कारवाईत काळेवाडी येथून साडेसात लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. सुमारे ट्रकभर असलेला हा गुटखा परराज्यातून आणला गेला असून आरोपी व्यापारी रवी तोलाणी फरार आहे.
काळेवाडीच्या नढेनगरमधील धर्मात्मा अपार्टमेन्टच्या ए विंग, गाळा क्र. १ मध्ये गुटखा साठवून येथून व्यापार सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला गुरूवारी रात्री मिळाली होती. ही इमारत मुरली हरूमल दुसेजा व राजा पहूमल जांगियानी यांच्या मालकीची आहे. त्यांनी रवी तोलाणी याला भाडेतत्त्वाने यातील गाळा वापरास दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी रात्रीपासूनच या गोदामावर पाळत ठेवली. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा सुगावा लागल्याने आरोपी व्यापारी रवी तोलाणी हा येथे फिरकलाच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुसेजा याच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.(प्रतिनिधी)

Web Title: Gatka seized for seven hundred million in Kalewadi