सावरदरीला गॅसवाहिनी फुटली
By Admin | Updated: January 17, 2015 23:38 IST2015-01-17T23:38:13+5:302015-01-17T23:38:13+5:30
पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना येथील गॅस पाईपलाईनला पोकलेन मशिनचा दात लागल्याने मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली.

सावरदरीला गॅसवाहिनी फुटली
आंबेठाण : पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना येथील गॅस पाईपलाईनला पोकलेन मशिनचा दात लागल्याने मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली. ही घटना सावरदरी परिसरात शनिवारी (दि. १७) रात्री घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनसाठी चिखली येथून नॅचरल गॅस आणला जातो. सावरदरी येथील ब्रिजस्टोन, हुंदाई आणि इतर कंपन्याना या गॅसचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी लोखंडी पाईपलाईन तर काही भागात प्लॅस्टिकच्या पाईपलाईनद्वारे गॅस वाहून नेला जातो. या परिसरातूनच भामा-आसखेड धरणावरून पुण्याला पाणी नेण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. ही पाण्याची लाईन खोदत असताना पोकलेन मशिनच्या खोऱ्याचा दात लागल्याने प्लॅस्टिकचा पाईप फुटला आणि मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला.
कामगारांची
धावपळ
४या गॅसची तीव्रता एवढी मोठी होती, की जवळपासच्या
३०० ते ४०० मीटर परिसरात हा वायू पसरला होता.
या वाहिनीलगतच
१५ ते २० फूट अंतरावर चारपदरी रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होती.
४जवळपास अर्धातास गॅसची गळती सुरू होती. या गळतीमुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची धावपळ उडाली.
४चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील संबंधित अधिकारी आल्यानंतर त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्रभर दुरुस्तीचे काम सुरू होते. मुख्य वॉल बंद केल्यानंतर गॅसगळती थांबली.