चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावच्या हद्दीतील ओढ्यात इंडियन आॅइल कंपनीचा गॅस टँकर क्रमांक (एमएच -०४.जेके - ४१४९ ) हा उलटला. घटनास्थळी बजाज आॅटो व इंडियन आॅइल कॉर्पोरेशन असे दोन अग्निशामक बंब, तीन क्रेन आल्या असून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही. वाहतूक पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करत आहेत. खराबवाडी गावचे पोलीस पाटील किरण किर्ते यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. हा अपघात आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास झाला आहे. हा टँकर तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे जात होता. या टँकरखाली एक दुचाकीस्वार अडकल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 14:38 IST
दुसऱ्या टँकरमध्ये गॅस स्थलांतर केल्याशिवाय टँकर ओढ्यातून वर काढण्याचे काम सुरू करता येत नाही.
चाकण- तळेगाव रस्त्यावर गॅस टँकर ओढ्यात उलटला
ठळक मुद्देनागरिकांकडून या टँकरखाली एक दुचाकीस्वार अडकल्याचा अंदाज व्यक्त