शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडरची साठेबाजी करुन जादा दराने विक्री : चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 09:22 IST

कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री    

ठळक मुद्दे१६ भरलेले सिलेंडर, ४८ ग्राहकांचे उपभोक्ता कार्ड आणि रोकड असा ३३ हजार ७३३ रुपयांचा माल जप्त

पुणे : लॉक डाऊनच्या काळात गॅस सिलेंडरचा बेकायदा साठा करुन त्याची जादा दराने विक्री करणार्‍या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलिसांनी अमित सुगंधचंद गोयल (वय ३०, रा. कोडियाड सोसायटी, चंदननगर) याच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गोयल यांच्या ताब्यातून विविध गॅस कंपन्यांचे १६ भरलेले सिलेंडर, ४८ ग्राहकांचे उपभोक्ता कार्ड आणि रोकड असा ३३ हजार ७३३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी बोपोडीमध्येही काळाबाजार करणार्‍या गॅस वितरक मालक व चालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट चार चे उपनिरीक्षक विजय झंजाड हे आपल्या पथकासह गस्त घालत  असताना कर्मचारी अब्दुल करीम सय्यद यांना माहिती मिळाली की, वडगाव शेरीतील सागर पार्क लेन नंबर २ येथे एक गॅस एजन्सीधारक हा ७९६ रुपयांचा गॅस सिलेंडर १ हजार रुपयांना विक्री करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून गॅस सिलेंडरची खरेदी करण्यासाठी सापळा लावला. त्यावेळी गोयल हा त्याच्याकडे सिलेंडर विक्री करण्यासाठी कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री करताना आढळून आला.ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदीप मुंढे, दीपक चव्हाण, मोहन वाळके, आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरPoliceपोलिस