शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Pune | चाकणला गॅस सिलिंडरचा स्फोट; एका महिलेचा मृत्यू तर ८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:39 IST

इतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

चाकण (पुणे) :चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाईमळा (चाकण, ता. खेड) येथे एका दुमजली इमारतीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि. २१) रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेत एका ज्येष्ठ महिलेचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला, तर इतर ८ जण जखमी झाले आहे. त्यापैकी एक तरुण गंभीररित्या भाजल्याने त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. इतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस सिलेंडरचा स्फोट इतका मोठा होता की, घटनस्थळापासून अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत मोठा आवाज झाला. स्फोट झालेल्या इमारतीच्या भिंतीचा मोठा भाग लगतच्या पत्र्याच्या घरावर कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राणूबाईमळा चाकण येथे परशुराम विठोबा बिरदवडे यांच्या राहत्या घरी गॅस सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये शेजारच्या घरावर भिंत पडून चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय.७५वर्षे ) यांचा मृत्यू झाला. यासह भाऊ यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बिरदवडे (वय.७८वर्षे ) यांच्या डोक्याला मार लागला. त्यांचा मुलगा तुकाराम परशुराम बिरदवडे हा किरकोळ जखमी झाला. सून संगीता सुरेश बिरदवडे (वय.४० वर्षे ) यांच्या पायास मार लागला असून, नातू अक्षय सुरेश बिरदवडे (वय.१८ वर्षे ) हा गंभीररीत्या भाजलेला आहे, तसेच नात वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय.२० वर्षे ) ही किरकोळ जखमी झाली.

यांच्यासह तीन अनोळखी भाडेकरू ज्यामध्ये २ महिला व १ पुरुष जखमी झाले. हा स्फोट खूप मोठ्या स्वरूपाचा होता. यामध्ये घराची पडझड झालेली असून, घराच्या भिंती तुटून शेजारील अंजाबाई प्रभाकर केळकर (वय.७५ वर्षे ) यांच्या घरावर पडल्याने त्या जखमी झाल्या. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकण