हल्ल्यातील जखमी झालेल्या गारवा हॉटेलचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:11+5:302021-07-22T04:09:11+5:30

पुणे : सोलापूर रस्त्यावरील गारवा हॉटेलचालकावर हल्लेखोराने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. ...

Garwa hotelier killed in attack | हल्ल्यातील जखमी झालेल्या गारवा हॉटेलचालकाचा मृत्यू

हल्ल्यातील जखमी झालेल्या गारवा हॉटेलचालकाचा मृत्यू

पुणे : सोलापूर रस्त्यावरील गारवा हॉटेलचालकावर हल्लेखोराने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. आखाडे यांचे सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन परिसरात गारवा हॉटेल आहे. दोन दिवसांपूर्वी ते सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उपाहारगृहासमोर खुर्ची टाकून बसले होते. त्या वेळी हल्लेखोर आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार दुचाकीवरून तेथे आले. काही कळायच्या आत एका हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या आखाडे यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला, असे लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार यांनी सांगितले.

आखाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण अद्यााप समजू शकले नाही. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Garwa hotelier killed in attack