पुण्यातही झालाय गरब्याचा इव्हेंट
By Admin | Updated: September 29, 2014 23:19 IST2014-09-29T23:19:48+5:302014-09-29T23:19:48+5:30
नवरात्रमध्ये गणोशोत्सवाप्रमाणो गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र मंडळे सुरू झाली आहेत.

पुण्यातही झालाय गरब्याचा इव्हेंट
>पुणो : नवरात्रमध्ये गणोशोत्सवाप्रमाणो गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र मंडळे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी मंडळे नसली तरी गरबा आणि दांडियाचे मोठमोठे मंडप मात्र आवजरून उभारले गेले आहेत. त्यामुळे नवरात्रीतील रात्रीचा नूर काही औरच होत गुजरातची ती झगमगाटाची दुनिया हल्ली महाराष्ट्रातही अनुभवायला मिळत आहे. यात सुमारे 500 ते 18
हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारले जात आहे.
याकडे नागरिक आकर्षित होत असले तरी सर्वसामान्यांना न परवडणारा हा उत्सव झाल्याची खंतही व्यक्त होत आहे.
याविषयी राधिका सराफ म्हणाल्या, ‘‘पूर्वी मंडळासमोर रंगणारा गरबा-दांडीया हल्ली सर्वत्रच दिसत आहे. गरब्याचा एक इव्हेंट झाला असून हजारो रुपयांची तिकिटे लावून या उपक्रमांचे आयोजन केले जाते. येथे उत्कृष्ट वेशभूषा, आकर्षक जोडी, दांडिया किंग, क्विन अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे फक्त दांडियासाठीचे
प्रवेश शुल्क भरून होत नाही, तर त्यासाठी तसाच आकर्षक ड्रेस, त्यावरील दागिने अशा अनेक गोष्टींचे मार्केट यावर पोसले जाते. त्यामुळे नवरात्रोत्सव हा फक्त शोबाजी
अन् बाजारपेठांचा झाला आहे.’’ (प्रतिनिधी)