भिगवण प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कचरा खरेदी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:39+5:302021-04-01T04:11:39+5:30
हे प्लॅस्टिक साधारणत: ग्रामपंचायतकडून पाच ते दहा रुपये किलो या दराने खरेदी केले जाणार असून नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा इतरत्र ...

भिगवण प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कचरा खरेदी उपक्रम
हे प्लॅस्टिक साधारणत: ग्रामपंचायतकडून पाच ते दहा रुपये किलो या दराने खरेदी केले जाणार असून नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिन्यातून दोन वेळा जमा करायचा आहे.
भिगवणमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून प्लॅस्टिकच्या कचऱ्याने याठिकाणी उग्र रूप धारण केले असल्याकारणाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे निश्चितच व्यापारी वर्गाला प्लॅस्टिकपासून होणारा त्रास कमी होणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार असून नागरिकांनी प्लॅस्टिक, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करण्याचे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भातील ठराव दिनांक 30 मार्च रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये करण्यात आला आहे.