कचराप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच्या तयारीत
By Admin | Updated: October 29, 2015 00:09 IST2015-10-29T00:09:40+5:302015-10-29T00:09:40+5:30
कचराप्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत; मात्र त्याची पालिका दखल घेत नसल्याने एमपीसीबीने फौजदारी कारवाई करण्याचा

कचराप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच्या तयारीत
पुणे : कचराप्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पालिकेला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत; मात्र त्याची पालिका दखल घेत नसल्याने एमपीसीबीने फौजदारी कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासाठी एमपीसीबीने न्यायाधीकरणाकडे पाच दिवसांचा कालावधी मागितला आहे.
न्यायमूर्ती व्ही. एस. किनगावकर आणि न्यायमूर्ती अजय देशपांडे यांच्या न्यायाधीकरणासमोर सुनावणी झाली. एमपीसीबीच्या वतीने पालिकेला वारंवार कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, पालिकेने त्याला समाधानकारक उत्तरे दिली नाही. एमपीसीबीने पाच दिवसांत कारवाई करू, असे उत्तर दिले. न्यायाधीकरणाने एमपीसीबीने पालिकेला किती नोटिसा बजावल्या व काय कारवाई केली याबाबतचा तक्ताच पुढील सुनावणीवेळी करण्यास सांगितले आहे.
याबाबतची हकीकत अशी, हंजरला कचरा व्यवस्थापनासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले होते. परंतु, हंजर तेथे कमी पडल्याचे पालिकेनी न्यायाधिकरणात सांगितले. त्याच बरोबर मागील वेळी तुळापूर, वढू येथील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
जवळच संभाजी महाराजांची समाधी असल्याने तेथील गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध करून
आंदोलन केल्याचे न्यायाधीकरणात सांगितले.