कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: December 29, 2014 23:24 IST2014-12-29T23:24:21+5:302014-12-29T23:24:21+5:30
राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर
दौंड : राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे
भिमनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या
कचरा डेपोची विल्हेवाट लावावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.
दौंड -सिद्धटेक रोडलगतच हा मोठ्या स्वरुपाचा कचरा डेपो आहे. येथून मोठी दूर्गंधी येते. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र, या दूर्गंधीमुळे नाक मुठीत धलन प्रवास करावा लागतो.
रस्त्याच्या कडेलाच कचरा डेपोचे डोंगर असल्याने याठिकाणी
जनावरांचा वावर असतो. कचरा रस्त्यावरही येतो. तसेच शहरात आणि रस्त्यावर मेलेली जनावरे याच
ठिकाणी आणून टाकतात. यामुळे भिमनगरचे रहिवाशी तसेच
सद्धटेकला जाणारे भाविक त्रस्त झालेले आहेत.
याच परिसरात विद्यालय असून भिमनगरची वस्ती गजबजलेली असते. या भागातील न्नागरीकांना
यामुळे आजारही झडू लागले आहेत. येथे डेंग्युचा रुग्ण देखील आढळला होता.
४यासंदर्भात माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले की, दौंडच्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मी नगराध्यक्ष असताना वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे दौंडच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र यातून काहीतरी चांगला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कटारिया म्हणाले.
४मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले की, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मेरगळवाडी परिसरात बघितली होती, मात्र सदरची जागा वनखात्याची असल्याने यासंदर्भात भोपाळ येथील वनखात्याच्या मुख्य कार्यालयाकडे त्याचबरोबरीने केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा लवकरच नगर परिषद करणार आहे.