शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

न्यायालयात कचराकुंड्या महिनाभरापासून धूळखात; शिवाजीनगर न्यायालयातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:39 IST

शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयातील स्वच्छता वाढावी, यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून देण्यात आलेल्या कचराकुंड्या सुमारे एक महिन्यापासून धूळखात आहे. 

ठळक मुद्देमहिनाभरापूर्वी न्यायालयात दाखल ११० पैकी फक्त ३० कचराकुंड्याच बसविण्यात आल्याबार असोसिएशन आणि जिल्हान्यायाधीश न्यायालयाचा आढावा घेणार : हेमंत झंजाड

पुणे : शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयातील स्वच्छता वाढावी, यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून देण्यात आलेल्या कचराकुंड्या सुमारे एक महिन्यापासून धूळखात आहे. महिनाभरापूर्वी न्यायालयात दाखल झालेल्या ११० पैकी फक्त ३० कचराकुंड्याच आतापर्यंत विविध ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. विविध कामांनिमित्त न्यायालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. यामुळे या परिसराची स्वच्छता व्हावी, म्हणून यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून क्लीन सिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत या कचराकुंड्या न्यायालय आवारात बसविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कुंड्या जुनी इमारत परिसरात बसविण्यात आल्या आहेत. पण अद्याप अनेक कुंड्या गेट नंबर ३ समोरच पडून आहेत. दरम्यान यापुर्वीही आदर पूनावाला यांच्याकडून न्यायालयांच्या स्वच्छतेसाठी दोन क्लीनिंग मशिन व त्यासाठी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत. या दोन्ही मशिनद्वारे दिवसभर न्यायालयातील स्वच्छता करण्यात येत असते. संध्याकाळच्या वेळी साचलेला कचरा एकत्र करण्यात येतो.

पुणे जिल्हा बार असोसिएसनचे उपाध्यक्ष हेमंत झंजाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बार असोसिएशन आणि जिल्हान्यायाधीश न्यायालयाचा आढावा घेणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी या कुंड्या बसवायच्या, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच या सर्व कुंड्या योग्य त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयातील स्वच्छतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे