कचरा बकेट घोटाळ्याला बसणार चाप
By Admin | Updated: October 27, 2014 23:54 IST2014-10-27T23:54:43+5:302014-10-27T23:54:43+5:30
महापालिकेकडून नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून वाटल्या जाणा:या कचरा वर्गीकरण बकेटचा अनागोंदी कारभार रोखण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे.

कचरा बकेट घोटाळ्याला बसणार चाप
पुणो : महापालिकेकडून नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून वाटल्या जाणा:या कचरा वर्गीकरण बकेटचा अनागोंदी कारभार रोखण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. दरवर्षी करोडो रुपये खर्चूनही या बकेटचा हिशेब लागत नसल्याने आणि त्याचा कथाकथीत काळाबाजार होत असल्याने आता या पुढे पालिकेकडून वाटल्या जाणा:या प्रत्येक बकेटचे ट्रँक रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यासाठीच्या सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकत्याच मध्यवर्ती भांडार विभागास दिल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या दशकभरात शहरातील कच:याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांना कचरावर्गीकरणाची शिस्त लागावी या उद्देशाने महापालिकेकडून नागरिकांना लहान आणि मोठय़ा कचरा बकेटचे वाटप केले जाते. 2003-04 नंतर महापालिका प्रशासनाने शहरात या बकेटचे वाटप करण्यास सुरुवात केली. त्यात नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून तसेच संबंधित प्रभागासाठी अंदाजपत्रकात घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात येणा:या निधीतून या बकेटची खरेदी केली जाते. त्यानंतर या बकेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात वाटल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात नगरसेवक या बकेट ताब्यात घेऊन त्यावर आपल्या नावाचे स्टिकर लावून त्या वाटत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेकदा या बकेट वाटप न होता वर्षानुवर्षे नगरसेवकांच्या प्रभागात पडून असल्याचेही समोर आले आहे. तर वर्षभरापूर्वी महापालिकेच्या या बकेट अंदमान निकोबारमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या बकेटचे वाटप केले जाते, तो साध्य होत नाही. तरीही दरवर्षी जवळपास 10 ते 11 कोटींच्या बकेट खरेदी केल्या जातात. त्यामुळे यापुढे या बकेटचे ट्रँक रेकॉर्ड ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
च्महापालिकेकडून वाटण्यात येणा:या या बकेटचा उपयोग अनेकदा नागरिक कचरावर्गीकरणासाठी न करता, धान्य किंवा पाणी साठविण्यासाठी करतात. तसेच या बकेट बाजारातही विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे त्या ठेकेदारांकडून घेताना, त्याला छिद्र पाडून त्या नागरिकांना देण्याचा निर्णय मागील वर्षी पालिका प्रशासनाने घेतला होता.
च्त्यास नगरसेवकांनी नकार देत, बकेटच्या वरील बाजूस असलेल्या पट्टीवर डोळयाला दिसणार नाही असे छिद्र पाडण्याची टूम नगरसेवकांनी आणि ठेकेदाराने शोधून काढली. मात्र, आता बकेटच्या मध्यभागी वरतून खाली डोळ्यांना स्प्ष्ट दिसतील अशी समांतर सहा छिद्रे पाडण्याच्या सूचनाही आयुक्तांनी प्रशासनास दिल्या आहेत.
बकेटवर आता सांकेतिक क्रमांक
प्रशासनाकडून वाटण्यात येणा-या या बकेट या पूर्वी कोणताही उल्लेख न करता थेट नगरसेवकांना दिल्या जात होत्या. त्यानंतर नगरसेवक त्यावर आपले नाव टाकून त्या नागरिकांना देत असत, त्यापुढे वाटल्या गेल्या की नाही त्या लाभार्थींनाच मिळाल्या की इतरांना दिल्या गेल्या याची कोणतीही माहिती एकत्रित प्रशासनाकडे ठेवली जात नव्हती.
या पुढे प्रत्येक बकेटवर टेंडर क्रमांक, प्रभाग क्रमांक, बादली क्रमांक आणि ती संबधित नागरिकास देण्यात आल्याचा दिनांक नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणती बकेट कधी खरेदी केली गेली आणि ती कोणाला व कधी दिली याची माहिती प्रथमच ठेवली जाणार आहे.
पहिल्यांदाच होणार बकेटच क्रॉस चेकिंग
च्ही बकेटवर टाकली जाणारी माहिती बकेटबरोबरच महापालिका प्रशासनाच्या रेकॉर्डवरही असणार आहे. त्यामुळे या माहितीच्या आधारे प्रशासनाकडून काही ठरावीक कालावधीनंतर, ज्या सोसायटी अथवा घरांमध्ये ती बकेट वाटण्यात आली आहे, तिची पालिका कर्मचारी स्वत: जाऊन तपासणी करणार आहेत. तसेच ती बकेट संबंधित ठिकाणी न आढळल्यास अथवा ती नागरिकास न देताच त्याची माहिती देण्यात आली असल्यास वाटप करणा:या संबंधित अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयावर त्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे बकेटच्या वाटपात अनागोंदी कारभार दिसून येण्याची शक्यता कमी आहे.